प्राचीन महाराष्ट्रातील राजे – सातवाहन राजघराणे
महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पुराव्यानिशी लिहायचा झाल्यास तो सातवाहनांन पासून लिहावा लागेल. कारण त्यांनीच महाराष्ट्राला भारतीय राजकारणाच्या नकाशावर स्थान मिळवून दिले. मौर्यांनी जशी ग्रीक आक्रमणे परतवून लावली त्याच प्रमाणे सातवाहनांनी शक आणि क्षत्रपांची आक्रमणे परतवून लावली. त्यांच्या पासूनच महाराष्ट्रात एकछत्री अंमल सुरू झाला