Blog

प्राचीन महाराष्ट्रातील राजे – सातवाहन राजघराणे

महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पुराव्यानिशी लिहायचा झाल्यास तो सातवाहनांन पासून लिहावा लागेल. कारण त्यांनीच महाराष्ट्राला भारतीय राजकारणाच्या नकाशावर स्थान मिळवून दिले. मौर्यांनी जशी ग्रीक आक्रमणे परतवून लावली त्याच प्रमाणे सातवाहनांनी शक आणि क्षत्रपांची आक्रमणे परतवून लावली. त्यांच्या पासूनच महाराष्ट्रात एकछत्री अंमल सुरू झाला

रामचंद्र अमात्यांच्या आज्ञापात्रातील दुर्गविचार – १

राजारामास राजसबाईपासून झालेला मुलगा श्री राजा शंभुछत्रपती हा कोल्हापूरच्या गादीवर आल्यानंतर (१७१४) त्यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंडित अमात्य हुकुमतपन्हा यांनी हे आज्ञापत्र १७१५-१६ च्या सुमारास लिहिले. हे आज्ञापत्र लिहिण्यामागील प्रमुख हेतू दोन :  “राजकुमार राजकार्यी सुशिक्षित व्हावेत” हा एक आणि “वरकड देशोदेशी ठेविले देशाधिकारी व पारपत्यागार यांणी नीतीने वर्तोन राज्य संरक्षण करावे” हा दुसरा. रामचंद्रपंत अमात्य …

रामचंद्र अमात्यांच्या आज्ञापात्रातील दुर्गविचार – १ Read More »

महाराष्ट्रातील भौगोलिक आश्चर्य

निसर्गामध्ये फिरताना डोळे उघडे ठेऊन आपण भटकंती केली तर आपल्याला बऱ्याच गोष्टी गवसू शकतात यामध्ये काही आश्चर्यकारक भौगोलिक गोष्टी, नैसर्गिक गोष्टी तसेच काही छोटे छोटे प्राणी, पक्षी, फुलपाखरे अश्या निसर्गाच्या घटकांची माहिती होतेच तसेच काही भौगोलिक गोष्टी अश्या देखील आपल्याला निसर्गात आपल्याला पहायला मिळतात त्या गोष्टी पाहून नक्कीच आपल्या मनाला प्रश्न पडतो की हे नक्की …

महाराष्ट्रातील भौगोलिक आश्चर्य Read More »

औरंगाबादची नहर-ए-पाणचक्की

छोटेखानी भटकंती भाग १ – औरंगाबादची नहर-ए-पाणचक्की

प्राचीन काळातील काही गोष्टी आपल्याला अगदी चक्रावून टाकतात. आपल्या पूर्वजांकडे विज्ञानाचे प्रचंड ज्ञान होते आणि त्याचा उपयोग ते रोजच्या व्यवहारातील गोष्टी पार पाडण्यासाठी करत असत याचा प्रत्यय आपल्याला जागोजाग येत असतोच. असाच एक प्रयोग औरंगाबाद शहरात असलेल्या पाणचक्की मध्ये केला आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वी मलिक अंबर या महान सेनापतीने औरंगाबादमध्ये नहरींच्या माध्यमातून पाणी आणले आणि शहराला …

छोटेखानी भटकंती भाग १ – औरंगाबादची नहर-ए-पाणचक्की Read More »

पारनेरजवळील सिद्धेश्वर | Firasti Maharashtrachi

पारनेरजवळील सिद्धेश्वर

नगर जिल्हा! निजामशाहीचे अस्तित्व आपल्या अंगाखांद्यावर खेळवत अनेक वारसा स्थळांनी समृद्ध असलेल्या या जिल्ह्यात काय नाही! किल्ले, लेणी, मंदिरे यांची अक्षरशः रेलचेल या अहमदनगर मध्ये. असेच एक आडवाटेवर असणारे मंदिर आहे ते नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात. पारनेर तालुका तसा प्रसिद्ध आहे तो जवळ असणाऱ्या राळेगणसिद्धी गावामुळे. पण पारनेर गावापासून साधारण ५-६ किमी अंतरावर निसर्गाच्या सानिद्ध्यात …

पारनेरजवळील सिद्धेश्वर Read More »

विश्रामबाग वाड्याचा इतिहास

श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे यांनी हा वाडा सन १८०७ रोजी बांधला. सदाशिव पेठेत ज्या ठिकाणी हा वाडा बांधला आहे त्या ठिकाणी पूर्वी हरीपंत फडके यांच्या मालकीची मोठी बाग होती. ती जागा सन १७९९ मध्ये दुसऱ्या बाजीरावाने विकत घेतली आणि पुढे आपल्या निवासस्थानासाठीम्हणून वाडा बांधायला घेतला.

मुशाफिरी

‘ मुसाफिर हुं यारो…ना घर है ठिकाना…मुझे बस चलते जाना है… ‘ महाराष्ट्रात अश्या अनेक आडवाटा आहेत अश्या आडवाटांवर भटकताना त्या वाटांवरची केलेली ‘मुशाफिरी’ हि कायमच अनुभव समृद्ध असते.  डोंगर-दऱ्या भटकताना विविध ठिकाणाची माहिती जमा करण्याचा छंद काही वेगळाच आनंद देऊन जातो. शालेय अभ्यासक्रमात वाचलेला इतिहास, भूगोल हे विषय जणू काही ह्या किल्यांवर आणि गिरीशिल्पांमधून आपल्याला खुणावू …

मुशाफिरी Read More »

error: Content is protected !!